पुस्तकातून लपवून डॉलरची तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तकातून लपवून डॉलरची तस्करी
पुस्तकातून लपवून डॉलरची तस्करी

पुस्तकातून लपवून डॉलरची तस्करी

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली. या दोघांनी पुस्तकांच्या पानांमध्ये अमेरिकन डॉलर लपवून आणले होते. यासोबतच त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील २.५ किलो सोनेही जप्त करण्यात आले. २२ आणि २३ जानेवारीला मुंबई विमानतळ कस्टमने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या दोन परदेशी नागरिकांना अटक केली. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ४.५४ कोटी रुपयांचे पेस्ट स्वरूपात ८.२३० किलो सोने जप्त करण्यात आले होते.