२१ कोटी किमतीचे ३६ किलो सोने जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२१ कोटी किमतीचे ३६ किलो सोने जप्त
२१ कोटी किमतीचे ३६ किलो सोने जप्त

२१ कोटी किमतीचे ३६ किलो सोने जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने मुंबईत मंगळवारी सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. डीआरआयने केलेल्या कारवाईत २१ कोटी रुपयांचे ३६ किलो सोने जप्त करण्यात आले.
हे सोने परदेशातून वेगवेगळ्या हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून मुंबईत आणण्यात आले होते. डीआरआयने या सोन्यासह २० लाखांची रोकडही जप्त केली. सोने वितळवणाऱ्या दुकानाच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. या हवाला प्रक्रियेत परदेशी नागरिकांचा समावेश असलेले एक सिंडिकेट सामील असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात समजले. त्या माहितीच्या आधारे सोमवारी (ता. २३) ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी १८ जानेवारीला डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून ४.५४ कोटी रुपये किमतीचे ८.२३० किलो सोन्याची पेस्ट जप्त केली होती. संशय येऊ नये यासाठी बहुतेक सोने अंतर्वस्त्रांमध्ये लपवले होते. त्यामुळे लपवलेले सोने शोधणे कठीण झाले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.