१९ लाखांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१९ लाखांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक
१९ लाखांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक

१९ लाखांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : बाजारात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोन गुन्हेगारांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली. फहील शेख, मेहबूब शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींकडून २०००, ५००, २०० आणि १०० च्या १९ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हे आरोपी पालघरमधून येऊन मुंबईत बनावट नोटाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती आहे.
२३ जानेवारी रोजी मालवणी पोलिसांना रात्री गस्त घालत असताना एमएचबी कॉलनी, मालवणी गेट क्रमांक ८ जवळ एक व्यक्ती आढळून आली. त्याची झडती घेतली असता आरोपी फहिल इरफान शेख (२१) याच्या ताब्यातून एक लाख रुपयांचे बनावट चलन जप्त करण्यात आले. याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर मालवणी पोलिसांनी दुसरा आरोपी मेहबूब नबीसाब शेख (२३) याला आरोपीच्या बोईसर पालघर येथील घरातून अटक केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरातून १८ लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. या बनावट नोटांमध्ये २००० रुपयांच्या ५०० नोटा, ५०० रुपयांच्या १८०० नोटा, २०० रुपयांच्या ५ नोटा, १०० रुपयांच्या ५ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण १९ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मालवणी पोलिस आरोपींकडे १९ लाख रुपयांच्या बनावट नोटा कोठून मिळाल्या, त्या कोठून छापल्या, त्यांच्यासोबत किती लोक होते, याचा तपास करत आहेत. पालघर बोईसर येथील आरोपी मेहबूब नबीसाब शेख (२३) याच्याविरुद्ध ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.