मुरबाड येथे करियर मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड येथे करियर मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद
मुरबाड येथे करियर मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

मुरबाड येथे करियर मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळ व घरत अभ्यासिका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. साजईफाटा येथील कुणबी समाज हॉलमध्ये हे शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्‍घाटन माजी आमदार गोटिराम भाऊ पवार यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती रामभाऊ दळवी, कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष शांताराम बांगर, उपाध्यक्ष दशरथ पष्टे, सरचिटणीस प्रकाश पवार, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मनोहर इसामे, उद्योजक पंढरीनाथ आलम, रिपाइं सेक्युलरचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, भाजप अनुसूचित मोर्चाचे तालुकाध्यक्ष आण्णा साळवे, घरत अभ्यासिकेचे अनिल घरत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून एलेंन करियर इन्स्टिट्यूटमधील गणेश देसाई, पंकज शर्मा, आसिफ खुर्शीद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र बांगर व भालचंद्र गोडांबे यांनी केले.