या मुलांचे पालक कोण ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या मुलांचे पालक कोण ?
या मुलांचे पालक कोण ?

या मुलांचे पालक कोण ?

sakal_logo
By

या मुलांचे पालक कोण?
नवी मुंबई, ता. २५ ः ठाणे जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशांनुसार पोलिसांना सापडलेली बेवारस मुलांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार कृष्णा हा मुलगा (अंदाजे वय २) नेरूळ पोलिस ठाणे हद्दीत दिनांक २९-११-२०२२ रोजी आढळून आला होता; तर सुजित (वय १ महिना) दिवस हा बालक २२-१२-२०२२ रोजी कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे. या दोन्ही मुलांना नेरूळ (नवी मुंबई) येथील विश्वबालक केंद्र येथे ठेवण्यात आले आहे; तरी या मुलांबाबत कोणालाही काही माहिती असल्यास संस्थेचा दरध्वनी क्रमांक ०२२-२७७२०७६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.