राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे विभागाचा दबदबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे विभागाचा दबदबा
राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे विभागाचा दबदबा

राज्यस्तरीय बॉक्सिंगमध्ये मुंबई, कोल्हापूर, पुणे विभागाचा दबदबा

sakal_logo
By

पालघर, ता. २५ (बातमीदार) : पालघर येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील वयोगटातील बॉक्सिंग स्पर्धेत मुलींच्या गटात मुंबई व कोल्हापूरने सर्वाधिक पदक मिळवली; तर मुलांच्या गटामध्ये पुणे विभागाने दबदबा निर्माण करत सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले. या स्पर्धा पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडल्या. या अंतिम फेरीच्या बॉक्सिंग लढतीचा शुभारंभ यशवंतराव चाफेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा सिंग, महावितरणचे प्रभारी अधिकारी युवराज जरक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, वामन वसलखांब, प्रकाश वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
पालघर खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरमध्ये सलग तीन दिवस राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. यामध्ये राज्यातील आठ विभागातील २१६ बॉक्सर सहभागी झाले होते. मुलींच्या गटात मुंबई व कोल्हापूर विभागाने समसमान सुवर्णपदक पटकावून स्पर्धेत दबदबा निर्माण केला; तर मुलांमध्ये अकरा विविध वजनी गटांमध्ये पुणे विभागाने सहा सुवर्णपदक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे यशवंतराव चाफेकर महाविद्यालय बॉक्सिंग असोसिएशन ऑफ पालघर जिल्हा यांनी सहकार्य केले.


---------------
सुवर्णपदक विजेते
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई विभागातून सुवर्णपदक पटकावणारे बॉक्सर इशरत अन्सारी, मधुरा पाटील, जागृती बोथ; कोल्हापूर विभागातून सृष्टी रासकर, स्वप्ना चव्हाण, वृषाली कारंजे; औरंगाबाद विभागातून साक्षी वाघिरे, खुशी जाधव; पुणे विभागातून वैष्णवी वाघमारे काया चौधरी; तर क्रीडा प्रबोधिनी गौरी मुरूमकर, कांचन सुरांसे यांनी पटकावले. मुलांमध्ये पुणे विभागातून शोएब सय्यद, अथर्व राजपूत, वेदांत इंगळे, पृथ्वीराज बागल, पूजा अपराध, कुणाल घोरपडे; तर क्रीडा प्रबोधिनीमधून देवा महागावकर, नीरज ठाकूर, हिमांशू चौधरी; तर नागपूर विभागातून अघोष अभिषेक जांगडी तेजस पेंडम यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.