Thur, Feb 2, 2023

प्लास्टिक पिशव्यांविरूद्ध जनजागृती
प्लास्टिक पिशव्यांविरूद्ध जनजागृती
Published on : 25 January 2023, 11:44 am
रेवदंडा (बातमीदार) : येथील बाजारपेठेतील काही व्यावसायिकांना बँक ऑफ बडोदातर्फे कापडी पिशवी देऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करा, अशी अनोखी जनजागृती करण्यात आली. बॅंकेमार्फत स्वच्छता पंधरवडा सुरू असून त्यानिमित्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करा आणि प्रदूषण रोखा यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती अलिबाग शाखेतील वरिष्ठ अधिकारी मायकल यांनी दिली. याप्रसंगी रेवदंडा शाखेचे व्यवस्थापक अभिषेक सुमन, कर्मचारी दिलीप पाटील आदी उपस्थित होते.