Fri, Feb 3, 2023

भारत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उत्तम जोशी
भारत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उत्तम जोशी
Published on : 25 January 2023, 10:37 am
ठाणे : भारत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उत्तम जोशी तसेच उपाध्यक्षपदी मिलिंद गोखले यांची २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी एकमताने निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी प्रियांका गाडीलकर यांनी घोषित केले. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीकरिता नवनिर्वाचित संचालक म्हणून डॉ. रवींद्रनाथ रणदिवे, किरण वैद्य, डॉ. राजेश्वर मोघेकर, सुहास मेहता, अॅड. श्रीराम देशपांडे, सनदी लेखापाल स्वाती गोखले, स्मिता महाजन, संजय पाटील, सिताराम गोसावी यांची नावे घोषित करण्यात आली.