डहाणूत डंपिंग समस्या ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत डंपिंग समस्या ऐरणीवर
डहाणूत डंपिंग समस्या ऐरणीवर

डहाणूत डंपिंग समस्या ऐरणीवर

sakal_logo
By

कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. हा रोजचा जमा होणारा कचरा शहरातील वडकून भागात असणाऱ्या लोकवस्तीच्या ठिकाणी साठवला जातो. त्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, डास निर्माण होतात. शिवाय कचऱ्यावर मोकाट जनावरे, कुत्री यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. वारा सुटल्यावर येथील कचरा, प्लास्टिक उडून अनेकांच्या घरात जात आहे. त्यामुळे डहाणू शहरातील कचऱ्याचे नीट व्यवस्थापन करावे आणि डम्पिंग शहरापासून लांब निर्मनुष्य ठिकाणी करावे, अशी मागणी अनेक नागरिक करत आहेत.

डहाणू नगर परिषद हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या शहरात मध्यवर्ती असणाऱ्या वडकून पांचाळ हॉलच्या बाजूला खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. येथे जमा केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग वाढतच आहेत. या डम्पिंगच्या जागेच्या जवळच विद्यार्थ्यांचे वसतिगृह, कॉलेज तसेच अनेक कारखाने असून या भागातील कचरा वाऱ्याने उडून नागरिकांच्या घरात, कारखान्यात जमा होतो. त्यामुळे या भागातील हे डम्पिंग ग्राऊंड हटवून दूर नेण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.

-----------------
डहाणू शहर, परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजच्या बाजारात भाजी, मासे यामुळे मोठा कचरा तयार होतो. सध्या असलेला डम्पिंग परिसर दूर न्यावा. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी. जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.
- अमित शेट्टी, डहाणू शहरप्रमुख, मनसे

--------
डहाणू नगर परिषदेतर्फे शहरात कचरा व्यवस्थापन केले जाते. सध्या असलेल्या डम्पिंगची जागा कमी पडते. त्यामुळे कचरा साठवण्यासाठी शहराच्या बाहेर जागा शोधण्याचे काम सुरू आहे.
- वैभव आवारे, सीईओ, नगर परिषद, डहाणू