सुनील दुबे यांना पूर्वांचल भूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील दुबे यांना पूर्वांचल भूषण पुरस्कार
सुनील दुबे यांना पूर्वांचल भूषण पुरस्कार

सुनील दुबे यांना पूर्वांचल भूषण पुरस्कार

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः घाटकोपर रामलीला महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि सेंच्युरियन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विश्वस्त व अध्यक्ष सुनील दुबे यांना पूर्वांचल भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वांचल विकास मंचतर्फे आयोजित पूर्वांचल महोत्सव कार्यक्रमात त्यांचा हा सन्मान करण्यात येणार आहे. पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मो. आरिफ नसीम खान असणार आहेत. या दरम्यान मुंबई पूर्वांचलमधील सर्व मान्यवरांनाही आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती विनोद सिंह यांनी दिली आहे.