भीषण आगीत एलईडी ट्यूब कंपनी जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण आगीत एलईडी ट्यूब कंपनी जळून खाक
भीषण आगीत एलईडी ट्यूब कंपनी जळून खाक

भीषण आगीत एलईडी ट्यूब कंपनी जळून खाक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) ः नालासोपारा पूर्व वाकनपाडा परिसरातील एलईडी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता. २५) दुपारी १२ वाजता घडली. यात कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. घटना घडली तेव्हा कंपनीत दोनशे ते अडीचशे कामगार होते. प्रसंगावधान राखत त्यांना बाहेर काढल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने दुपारी दोन वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीची तीव्रता एवढी होती, की परिसरात अर्धा किमीपर्यंत आगीच्या झळा आणि धूर जाणवत होता.
नालासोपारा पूर्व वाकनपाडा परिसरात रामा इंडस्ट्री अवधूत आश्रमाजवळ ही एलईडी लाईटचे ट्यूब, बल्फ बनवणारी कंपनी आहे. या कंपनीत ३०० कामगार काम करतात. बुधवारी (ता. २५) नेहमीप्रमाणे हे सर्व कामगार कंपनीत काम करीत होते. कंपनीच्या आतमध्ये इलेक्ट्रिक ट्यूब बनवण्यासाठी भट्टी होती. याच भट्टीत शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. सर्व परिसरात आगीचे आणि धुराचे लोळ निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. सर्वात आधी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली.
--
घटना घडल्यानंतर पोलिस, महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळावर पोहचले. दोनशे ते अडीचशे कामगारांना रेस्क्यू करून बाहेर काढले. यात कोणीही जखमी किंवा मयत नाही. ही आग विझवण्यासाठी ३ बंब, ४ पाण्याचे टँकर वापरले आहेत. आग विझवण्यासाठी दोन तास अग्निशमन जवानांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
- वसंत लबढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक