१८ लाखांच्या बनावट नोटा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१८ लाखांच्या बनावट नोटा जप्त
१८ लाखांच्या बनावट नोटा जप्त

१८ लाखांच्या बनावट नोटा जप्त

sakal_logo
By

पालघर, ता. २५ (बातमीदार) ः पालघर शहरात एके ठिकाणी छापा टाकून १८ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पालघरमध्ये बनावट नोटा छापण्याचा कारखाना पोलिसांनी शोधून काढला होता.

मुंबईमधील मालाड- मालवणी परिसरात एमएचबी कॉलनी गेट नंबर ८ या ठिकाणी फईल इरफान शेख हा बनावट नोटांचे वितरण करण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली होती. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ९९ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्याची चौकशी केली असता या नोटांचा संबंध पालघरमध्ये असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर पोलिसांनी पालघरमधील मेहबूब शेख राठी याच्या घरावर छापा टाकला. त्याच्याकडे ५०० व दोन हजार रुपयांच्या १८ लाख किमतीच्या बनावट नोटा सापडल्या. सहायक पोलिस निरीक्षक शिवशंकर भोसले, नीलेश साळुंखे, कर्मचारी माणिक मोरे, अनिल पाटील, अरुण राठोड, विलास आव्हाड, दिवेश मोरे, मिथुन भट, नवनाथ शिंदे, सचिन वळतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केल्याची माहिती मालवणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर भालेराव यांनी दिली.