घरफोडी करणारी चोरी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणारी चोरी अटक
घरफोडी करणारी चोरी अटक

घरफोडी करणारी चोरी अटक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : नालासोपारा परिसरात घरफोडी, चोरी करून फरारी होणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या टोळीतील तिघांना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांनी पेल्हार पोलिस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून टाटा एस कंपनीचा एक टेम्पो, एक दुचाकी, कटर, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पाना असा एकूण ५ लाख ९६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

राजेश कदम उर्फ घोचू, अजयन पाऊर विडू ऊर्फ पी व्ही, हरिंद्र गुप्ता असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे तिघेही कांदिवली, बांद्रा, नालासोपारा परिसरात राहणारे आहेत. यातील राजेश कदम याच्यावर मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड या परिसरात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. अजयन विडू याच्यावर नालासोपाराच्या तुलिंज, वाकोला, मुंबई या परिसरात ३ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पेल्हार पोलिस ठाणे हद्दीतील वसई पूर्व नवजीवन सोसायटीमधील मामुन हारून पियार्जी यांच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडून, दुकानातील विविध कंपन्यांच्या मोटार सायकलचे वेगवेगळे पार्ट, डिव्हीआर, टीव्ही, टुल्स असा एकूण २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल ५ ते ७ जानेवारीच्या दरम्यान चोरी झाला होता. याबाबत पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.