मुंबई विमातळावर ४५ इलेक्ट्रिक वाहने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमातळावर ४५ इलेक्ट्रिक वाहने
मुंबई विमातळावर ४५ इलेक्ट्रिक वाहने

मुंबई विमातळावर ४५ इलेक्ट्रिक वाहने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) बुधवारी (ता. २५) इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्‍ही) पहिली तुकडी दाखल झाली आहे. इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सीएसएमआयएने सध्याच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा ताफा बदलून ४५ ‘ईव्ही’ सादर केल्या आहेत.
कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सीएसएमआयएचा २०२९ पर्यंत त्याच्या नेट झिरो मिशनचा भाग म्हणून इंधनावर चालणारी सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्‍ये बदलण्यात येणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे. हा बदल म्‍हणजे सीएसएमआयएच्या ‘ऑपरेशनल नेट झिरो’ योजनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जानेवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या ४५ ईव्‍हींव्यतिरिक्त, सीएसएमआयए पुढील आर्थिक वर्षात आणखी ६० ईव्‍ही तैनात करण्‍याची योजना आखली आहे. ज्‍यामध्‍ये रुग्णवाहिका, फॉरवर्ड कमांड पोस्ट, सुरक्षा व एअरसाइड ऑपरेशन्स आणि मेन्‍टेनन्‍स युटिलिटी वाहनांचा समावेश आहे. उर्वरित वाहने टप्प्याटप्प्याने बदलण्यात येतील. सीएसएमआयए २०२९ पर्यंत सीएसएमआयएच्या नेट झीरोचे समर्थन करण्याकरिता ईव्‍हींचा अवलंब करण्‍यासाठी विमानतळावर कार्यरत भागधारकांशी संलग्न होण्याचीदेखील योजना आखत आहे.
......
विमानतळावर चार्जिंग स्टेशन
विमानतळाने टर्मिनल १ वर पी१ - मल्टी लेव्हल कार पार्किंग (एमएलसीपी), टर्मिनल २ वर पी५ - एमएलसीपी आणि सीएसएमआयएच्या एअरसाइडवर बारा प्रबळ डीसी फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन्‍स सुरू केले आहेत. हा उपक्रम गतिशीलतेमध्ये जीवाश्म इंधन जाळल्यामुळे जवळपास २५ टक्‍के हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यामध्‍ये मदत करेल. तसेच, विमानतळावर आता एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) च्‍या एअरपोर्ट कार्बन ॲक्रिडेशन (एसीए) प्रोग्रामचा हायेस्‍ट-लेव्‍हल ४+ ‘ट्रान्झिशन’ आहे.