Sun, May 28, 2023

७५ लाखांचा गुटखा जप्त
७५ लाखांचा गुटखा जप्त
Published on : 27 January 2023, 3:12 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेच्या पथकाने डोंगरी, नळ बाजार परिसरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दुकान व गोडाऊनवर छापे टाकले आहेत. यात ७५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. या वेळी दोन दुकानमालक आणि सात कामगारांना अटक करण्यात आली आहे. अवैध गुटखा विक्रीवरील ही या आठवड्यातील दुसरी कारवाई आहे.
डोंगरी व नळ बाजार परिसरात अवैध गुटखाविक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी घटनास्थळावरून दुकान मालक आणि कामगारांना अटक करण्यात आली. तसेच, मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. याआधी बोरिवली येथे छापा टाकून १२.५९ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या वेळी चार आरोपींना अटक करण्यात आली होती.