Tue, March 21, 2023

ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा उत्साहात
ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा उत्साहात
Published on : 28 January 2023, 12:51 pm
ठाणे, ता. २८ (बातमीदार) ः मध्यवर्ती समिती ठाणे व सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन गाबडबाग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सदाशिव देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि समाधान, ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येऊ शकतात असे उपक्रम अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ही कार्यशाळा सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ समता नगर येथे पार पडली. या शिबिराला सर्व संघांचे अध्यक्ष व सचिव तसेच सदस्यदेखील उपस्थित होते. या वेळी सुरेश गुप्ते, आसावरी फडणवीस, प्रमोद ढोलके यांनी मार्गदर्शन केले.