उल्हासनगरात मनसेचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात मनसेचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण
उल्हासनगरात मनसेचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण

उल्हासनगरात मनसेचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : पालिका कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार-कर्मचारी सेनेचे उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी एल्गार पुकारला आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहणार, असा पवित्रा दिलीप थोरात यांनी घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जी वेतनवाढ देण्यात येते ती पूर्णतः देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना क्रमशः १०, २०, ३० वर्षांची नियमित सेवा झाल्यानंतर तीन लाभांची वेतनवाढ देण्यात विनाकारण उशीर करण्यात येत असतो. हा उशीर करण्यात येऊ नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाल्मीकी, मेहतर समाजातील वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नियुक्त्या करण्याचे आदेश दिले असतानादेखील त्याची अंमलबजावणी होत नाही, ती अंमलबजावणी त्वरित लागू करण्यात यावी, कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येते, त्यात स्थानिकांना डावलले जाते, हा प्रकार निंदनीय असून स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळावे, अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार- कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.