Sat, April 1, 2023

केडीएमसीतर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात
केडीएमसीतर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात
Published on : 28 January 2023, 10:43 am
कल्याण, ता. २८ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांर्गत परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत नववी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा २१ केंद्रांवर घेण्यात आली. स्पर्धेत २०,६२२ विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धांसाठी जी-२० जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृतमहोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणामध्ये भारत नंबर वन, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिनाकडे मोदीजींनी वेधलेले जगाचे लक्ष, बेटी बचाव बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला- मोदीजींचा संवेदनशील निर्णय या विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटण केले.