Sun, April 2, 2023

संविधान रॅलीत १५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग
संविधान रॅलीत १५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग
Published on : 28 January 2023, 10:41 am
उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) ः नर्सचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यात आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यात पुढाकार घेणाऱ्या उल्हासनगरातील आदर्श आदिवासी विकास व शैक्षणिक संस्था आणि सिद्धांत समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान रॅलीत १५० प्रशिक्षणार्थी नर्स मुलींनी सहभाग घेतला. संस्थेच्या आवारात उल्हासनगर पालिकेतील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक संजीवनी अमृतसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुमित्रा ब्राह्मणे, सत्यवान जगताप, लता जगताप, सृष्टी जाधव, वीरेंद्र जाधव, नितेश वाकळे, जयवंत तुपे, स्नेहल तायडे, राहुल पांडे, शीतल बगाडे, अमोलिका राजपूत व भरत राठोड यांनी उपक्रम सिद्धीसाठी विशेष प्रयत्न केले.