कुष्ठरोग मुक्तीचा लढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुष्ठरोग मुक्तीचा लढा
कुष्ठरोग मुक्तीचा लढा

कुष्ठरोग मुक्तीचा लढा

sakal_logo
By

पनवेल ः बातमीदार
पनवेल महापालिकेमार्फत ३० जानेवारीपासून १३ फेब्रुवारीपर्यंत ‘स्पर्श’ या अभियानातून कुष्ठरोगाबाबत जनजागृती केली जाणार आहे. याच अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कुष्ठरोगाच्या उच्चाटनासाठी विविध आरोग्याविषयक शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
-------------------------------------------------
कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ३० जानेवारी पासून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रामुख्याने महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कुष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानातून ३० जानेवारीला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मॅरेथॉन स्पर्धा, ३ फेब्रुवारीला फडके नाट्यगृहात ‘कुष्ठरोगाविषयी जनजागृती’ या विषयावर आरोग्य कर्मचाऱ्याच्या रांगोळी स्पर्धा तसेच कर्करोग (Cancer) विषयी पोस्टर स्पर्धेतून जनजागृती केली जाणार आहे.
------------------------------------
शालेय मुलांच्या सहभागावर भर
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ‘सपना’ या काल्पनिक संकल्पनेसह शाळकरी मुली मार्फत कुष्ठरोग विषयी माहिती व संदेश देऊन रॅली, महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत शिक्षणविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-५ खारघर यांच्यावतीने कुष्ठरोगाविषयी पथनाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे.