एसएमजी विद्यामंदिरमध्ये पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसएमजी विद्यामंदिरमध्ये पुरस्कारांचे वितरण
एसएमजी विद्यामंदिरमध्ये पुरस्कारांचे वितरण

एसएमजी विद्यामंदिरमध्ये पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : ओम साई शिक्षण संस्थेच्या एसएमजी विद्यामंदिर दिवा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील गायकर यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, संस्थेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या वरिष्ठ शिक्षिका मंगल मिसाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज विभागातील १० वी मराठी माध्यमातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रांजली वाळवे, इंग्रजी माध्यमातील अलिशा पांडा, १२ वी वाणिज्य विभाग सत्यम चौहान, विज्ञान विभाग जयश्री चौधरी व एसएमजी ज्युनिअर कॉलेज डोंबिवली वाणिज्य विभागातील नेहा गुप्ता यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले.