वसंत पंचमीनिमित्ताने आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंत पंचमीनिमित्ताने आरोग्य तपासणी
वसंत पंचमीनिमित्ताने आरोग्य तपासणी

वसंत पंचमीनिमित्ताने आरोग्य तपासणी

sakal_logo
By

जुईनगर, ता. २८ (बातमीदार) : सार्वजनिक पूजा आणि सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने, वसंत पंचमीनिमित्ताने सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत चष्मा वाटप आणि ''सुरसंग्राम'' सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
बेलापूर येथील सार्वजनिक पूजा आणि सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंत पंचमी निमित्ताने २६ जानेवारीला सेक्टर-१५ येथील मैदानात सरस्वती मातेची स्थापना आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर आरोग्य व नेत्रतपासणी आणि मोफत चष्माचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सूरसंग्राम पुरस्कार विजेते बिहारी कलाकार मोहन राठोड, आदिती राज आणि राधा मोर्या यांच्या बहारदार गाण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक समिती अध्यक्ष उत्तर भारतीय सेनाचे उप जिल्हा संघठक यांच्यासह एस. सी. मिश्रा, कमलेश वर्मा, मुनींद्र झा यांनी केले. या वेळी नामदेव भगत, काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, रामाशेठ वाघमारे, जयराम पासवान, चंद्रमोहन मिश्रा, शुभांकर झा, संगीत चौधरी, मोहन झा, मुकेश सिंह, रामबशिष्ठ जायसवाल, प्रमोद मुखिया, बलवंत सिंह, मुकेश गुप्ता, रजनिश मिश्रा, अवधेश चौधरी, रामभरोस शर्मा, रामचंद्र शर्मा, सूरज पासवान, सुनील झा, संतोष चौधरी, जी. डी. सिंह आदी उपस्थित होते.