Thur, March 30, 2023

दागिने चोरीप्रकरणी महिला अटकेत
दागिने चोरीप्रकरणी महिला अटकेत
Published on : 28 January 2023, 2:12 am
मुंबई, ता. २८ ः घरमालकाच्या घरातून दोन लाखांचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला या घरात घरकाम मजूर म्हणून काम करत होती. तिला शुक्रवारी (ता.२७) अटक करण्यात आली.
तक्रारदार दाम्पत्य हे काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. त्यांची दोन लहान मुले घरी होती. त्यांची काळजी घेण्यास आरोपी मोलकरणीला सांगण्यात आले होते. जेव्हा ते दिल्लीहून परत आले तेव्हा आरोपी महिला काम सोडून निघून गेली होती आणि ती तिचे वेतन घेण्यासाठीसुद्धा आली नाही. त्याचवेळी घरातील काही दागिने गायब असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांशी संपर्क साधला, असे घरमालक महिलेने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला व तिला अटक केली. तिच्याकडून दोन लाखांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.