सहकारी पतसंस्था स्थापन करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी पतसंस्था स्थापन करणार
सहकारी पतसंस्था स्थापन करणार

सहकारी पतसंस्था स्थापन करणार

sakal_logo
By

मुरबाड, ता. २९ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात सावकारी नष्ट करण्यासाठी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असून, जिल्हा परिषदेच्या एका गटात एक पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहिती माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिली. राजकारणापासून अलिप्त लोकांचा सहभाग घेऊन तालुका क्रीडा स्पर्धा, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणार असून त्याची सुरुवात मुरबाड तालुक्यातील शिरोशी गावापासून पुढील महिन्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ. जी. नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोपरखैरणे नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्‌घाटन नाईक यांच्या हस्ते शिवळे येथे रविवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोटीराम पवार, मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनंत कथोरे, उद्योजक भाई शेटे, शिवळे गावच्या सरपंच नीलिमा जाधव, उपसरपंच संचिता इसामे व सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना जनतेच्या अडचणी, समाजाच्या संवेदना समजाव्यात म्हणून एनएसएस शिबिर उपयोगी असते. त्याद्वारे शिवळे गाव प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले. गोटीराम पवार हे समाजाला दिशा देणारे नेतृत्व असून, राजकारणातील सर्वात जवळचा सहकारी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. माजी आमदार गोटीराम पवार यांनी ग्रामस्थांना लक्षात राहील, असे काम करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दत्तात्रय भुरके यांनी सूत्रसंचालन डॉ. दत्ता घोडके यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद महाडिक यांनी केले. शिबिरात शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी गणेश नाईक यांच्‍या हस्ते शिवळेच्या सरपंच व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
--------------------------------------------
मुरबाड : माजी आमदार गोटीराम पवार यांचा सत्कार करताना माजी मंत्री गणेश नाईक.