Tue, March 28, 2023

कल्याण एसटी डेपोची इमारत जमीनदोस्त
कल्याण एसटी डेपोची इमारत जमीनदोस्त
Published on : 30 January 2023, 11:46 am
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनबाहेर सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५० वर्षीय जुना एसटी डेपो तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा डेपो नव्याने बांधण्याबाबत राज्याच्या एसटी महामंडळाला सादर केलेल्या आराखड्याला अटी व शर्ती लागू करत एसटी महामंडळाने हिरवा कंदील दिल्याने आता एसटी डेपोही स्मार्ट होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ जानेवारी २०२१ रोजी झाले होते. या कामासाठी सुमारे ४९८ कोटी रुपये खर्च होणार आहे. हा डेपो १९७२ मध्ये सुरू झाला असून, सध्या त्यांच्या ताफ्यात ७० हून अधिक बस आहेत.