Wed, March 29, 2023

सेंट ॲलोशिअस शाळेत पिरॅमिट सादरीकरण
सेंट ॲलोशिअस शाळेत पिरॅमिट सादरीकरण
Published on : 30 January 2023, 12:15 pm
वसई, ता. ३० (बातमीदार) : नालासोपारा पूर्व येथील सेंट ॲलोशिअस शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिडटची प्रतिकृती साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी डॉ. आशा मोर्या, फुटबॉलपटू प्रांजल कुमार उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, देशभक्तिपर भाषणातून देशभक्तांच्या कार्याची महती विशद केली. मुख्याध्यापिका शिला मनोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.