Tue, March 28, 2023

डोळखांबच्या स्मार्ट ब्लाइंड किटला प्रथम क्रमांक
डोळखांबच्या स्मार्ट ब्लाइंड किटला प्रथम क्रमांक
Published on : 30 January 2023, 12:04 pm
खर्डी, ता. ३० (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील शिक्षण विभागाच्या वतीने खर्डी येथील उच्चमाध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या ६० शाळांनी सहभाग घेतला होता. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खर्डी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप अधिकारी व गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांचे हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात स्मार्ट ब्लाइंड किट या डोळखांब येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपकरणाला प्रथम, वासिंदच्या न्यू आयडियल स्कूलच्या अँगल मेजर मोनोक्युलार या उपकरणाला द्वितीय व डोळखांब आश्रमशाळेच्या स्मार्ट डष्टबिन या उपकरणाला तृतीय क्रमांक मिळाला.