तळोज्यावर करडी नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यावर करडी नजर
तळोज्यावर करडी नजर

तळोज्यावर करडी नजर

sakal_logo
By

खारघर, ता. ३० (बातमीदार) : तळोजा वसाहत; तसेच औद्योगिक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिस ठाण्याच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल रूम आणि फिटनेस सेंटरचे उद्‍घाटन नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. तळोज्यामध्ये एकूण १६० सीसीटीव्ही बसवण्यात आल्याने वसाहतीसह औद्योगिक परिसरात तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे.

या वेळी पोलिस सहआयुक्त संजय मोहिते, अपर पोलिस आयुक्त महेश धुर्ये, परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाने, सहायक पोलिस भागवत सोनावणे, पोलिस अधिकारी प्रशांत मोहिते, अमित काळे, संजय पाटील, तिरुपती काकडे उपस्थित होते.

तळोजा औद्योगिक वसाहतीत मोठ-मोठ्या कंपन्या कार्यरत आहे. तसेच तळोजा फेज एक आणि दोन वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांत नवी मुंबई मेट्रो सुरू होणार आहे. याशिवाय तळोजा वसाहतीत मेट्रो कारशेड, पेठाली आणि पेंधर मेट्रो स्थानक आहे. नर्सरी, पूर्व प्राथमिक आणि शाळांच्या संख्येतही वाढ होत आहे. काही बँका नवीन शाखा उघडण्याच्या तयारीत आहेत. तळोजा वसाहतीच्या विकासात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चोरी, घरफोडी, महिलेची छेडछाड आदी विविध गुन्हेही वाढत आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी तळोजा वसाहत आणि औद्योगिक परिसरात नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिस ठाण्याच्या वतीने १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सर्व कॅमेर्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तळोजा पोलिस ठाण्यात स्वतंत्र सीसीटीव्ही कंट्रोल रूम तयार केले आहेत. या कंट्रोल रूमचे उद्‍घाटन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

महत्त्वांच्या ठिकाणी कॅमेरे
तळोजा औद्योगिक परिसरात वाढत्या चोरीचे प्रमाण; तसेच काही टँकरचालकाने तळोजा रस्ते, चौक, वर्दळीचा परिसर, शाळा, महाविद्यालये, बँका, रेल्वेस्थानक परिसर आदी महत्त्वाच्या ठिकाणी १६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी तळोजा एमआयडीसीमधील काही कंपनीने सहकार्य केले आहे. तळोजा वसाहत आणि औद्योगिक परिसरात तिसऱ्या डोळ्याची नजर असणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

तळोजा पोलिस ठाणे हद्दीत काही महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, कंट्रोल रूम वेगळ्या ठिकाणी होते. आता कंट्रोल रूमसाठी स्वतंत्र खोली असून, फिटनेस सेंटर उभारण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन पोलिस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले आहे. उद्‍घाटनप्रसंगी कॅमेरा वाढवण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. कंपनीच्या सहकार्याने काही ठिकाणी कॅमेर्‍यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
- जितेंद्र सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळोजा पोलिस ठाणे