Thur, March 23, 2023

‘हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका’
‘हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका’
Published on : 31 January 2023, 10:23 am
सरळगांव, ता. ३१ (बातमीदार) : दुचाकी घराबाहेर काढण्यापूर्वी चालकाने डोक्यात हेल्मेट घातलेच पाहिजे, असा सल्ला वडीलकीच्या नात्याने आमदार किसन कथोरे यांनी तरुणांना दिला. मुरबाड येथे सामाजिक कार्यकर्ते व देवा ग्रुपचे अध्यक्ष मनोज देसले, मुरबाडच्या नगराध्यक्षा मानसी देसले यांनी ‘एक मित्र एक हेल्मेट’ हा संकल्प केला होता. या संकल्पाची पूर्तता आमदार किसन कथोरे, व्याख्याते गणेश शिंदे, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, माजी नगराध्यक्ष मोहोन सासे, सुरेश बांगर, नितीन मोहोपे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी एक हजार हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. हा संकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी हेल्मेट देऊन सहकार्य केले. ‘एक मित्र एक हेल्मेट’ हा संकल्प व त्याची पूर्तता केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थित पाहुण्यांनी कौतूक केले.