उल्हासनगरात शिवसेनेतर्फे हळदी-कुंकू समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात शिवसेनेतर्फे हळदी-कुंकू समारंभ
उल्हासनगरात शिवसेनेतर्फे हळदी-कुंकू समारंभ

उल्हासनगरात शिवसेनेतर्फे हळदी-कुंकू समारंभ

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडी शहर शाखेने उल्हासनगरात आयोजित केलेल्या भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महात्मा फुले नगरातील हिललाईन पोलिस ठाण्यासमोर पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना कल्याण जिल्हा समनव्यक धनंजय बोडारे, शहरप्रमुख कैलाश तेजी, महिला आघाडी संघटक जया तेजी, विभागप्रमुख अनिल(लाल्या) कुंचे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आली. या वेळी महिला आघाडी कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे, उपजिल्हा संघटक अंजली राऊत, माजी नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, अंबरनाथ महिला संघटक निता परदेशी, उपशहरप्रमुख मधुकर साबळे, कल्याण जिल्हा युवासेना सरचिटणीस रमेश कांबळे, राजू माने, उपविभाग प्रमुख राजू चिकणे, ज्ञानेश्वर करवंदे, राजू घड्याळी, शाखा प्रमुख भाऊ म्हात्रे, शिंगाडे, संदीप अढागळे, महिला आघाडीच्या उपशहर संघटक सुनीता साबळे, निलम लोटानी, सुरेखा दिविलकर, हेमा कांडे, रसिका बागवे, सुनिता धवाने, अस्मीता भालेराव, रेखा येवले, माया कदम, विभाग संघटक हर्षदा नवलकर, सुषमा साळुंके, उज्वला दराडे, प्रिया गायकवाड, सावित्री पाखरे, सुषमा तुळसकर, अमोल धुमाळ, चंदा धुमाळ, अंजन इंगळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासैनिक सुरज तेजी, सागर तेजी, सन्नी सिरसवाल यांनी नियोजन केले होते; तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर करवंदे यांनी केले.