Tue, March 21, 2023

मुलुंडमध्ये हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिर
मुलुंडमध्ये हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिर
Published on : 31 January 2023, 11:57 am
मुलुंड, ता. ३१ (बातमीदार) ः ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंगतर्फे रविवारी (ता. २९) हौसिंग सोसायटी या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मुलुंडमधील सार्वजनिक शिक्षण संस्थेचे पुरंदरे हायस्कूल येथे करण्यात आले होते. या क्षेत्रातील तज्ज्ञ संतोष (भाई) पालव यांनी या वेळी मार्गदर्शन केले. हौसिंगसंबंधी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी या वेळी उपस्थितांनी केली. हौसिंग सोसायटी म्हणजे काय, त्याची नोंदणी झाल्यावर असणारी व्याख्या पालव यांनी नेमकेपणाने सांगितली. ॲड. प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले.