जीवनदीप विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनदीप विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात
जीवनदीप विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

जीवनदीप विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

टिटवाळा, ता. २ (बातमीदार) ः जीवनदीप महाविद्यालयात नुकताच वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा आयकर विभागाचे आयुक्त अखिलेंद्र यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील क्रीडा व अन्य स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा, व्यक्तिगत व सांघिक गुणगौरव अखिलेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आला. यादव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीवर प्राचार्य डॉ. के. बी. कोरे यांनी सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी जीवनदीप शिक्षण संस्था ग्रामीण भागात वंचिताच्या शिक्षणासाठी कसे काम करत आहे, याचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के. बी. कोरे यांनी केले. व्यासपीठावर टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, सिनेअभिनेते व दिग्दर्शक दीपक पाटील यांच्यासह सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रिया जाधव व प्रा. पौर्णिमा एगडे यांनी केले; तर आभार प्रा. डॉ. दौलतराव कांबळे यांनी केले. या वेळी अभिनेते समीर पाटील, सागर पगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.