कर्जत तालुक्यात रानगव्याचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत तालुक्यात रानगव्याचा वावर
कर्जत तालुक्यात रानगव्याचा वावर

कर्जत तालुक्यात रानगव्याचा वावर

sakal_logo
By

नेरळ, ता.३१(बातमीदार)ः कर्जत तालुक्यात रानगवा फिरत असल्यचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. त्यामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते. पण हा रानगवा माणगाव मार्गे वरेडी परिसरात गेला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
कर्जत तालुक्यात याअगोदर बिबट्या, नीलगाय, माकडे असे काही जंगली प्राणी मानवी वस्तीत आले असल्याचे पहायला मिळाले आहे. मात्र, मुळातच लाजाळू आणि स्वभावाने शांत असा रानगवा कर्जत तालुक्यात पाहिला गेला आहे. सोमवारी कर्जत येथील भिसेगाव खिंडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास हा रानगवा दिसून आला होता. तर सकाळी माणगावातील वरेडी गावातील लोकांना रानगव्याचे दर्शन झाले आहे. दरम्यान, या रानगव्याच्या बांध्यानुसार हा प्रौढ नर असल्याचा अंदाज प्राणीमित्रांनी वर्तवला आहे.
---------------------------------
भिसेगाव खिंडीत गवा असल्याची माहिती मिळाल्यावर पूर्व व पश्चिम दोन्ही विभागातील वन कर्मचारी शोधार्थ फिरत होते. मात्र, सध्या तो वरेडी गावात आढळून आल्यानंतर माथेरान वन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.
-प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत पूर्व