टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदाणी बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदाणी बाहेर
टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदाणी बाहेर

टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदाणी बाहेर

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ ः हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उडालेल्या गोंधळात अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरचे मूल्य घसरल्यामुळे गौतम अदाणी आता जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

गौतम अदाणी हे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या शेअरचे मूल्य असेच पडत राहिले, तर ते कदाचित फक्त आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आपले स्थान कायम ठेवू शकतील, अशीही शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अडाणी यांचा क्रम याआधी चौथा होता; मात्र हिंडनबर्गच्या गोंधळानंतर त्यांच्या शेअर्सचे मूल्य घसरल्यामुळे त्यांची संपत्ती चौतीस अब्ज अमेरिकी डॉलरने कमी झाली. त्यामुळे आता त्यांना जागतिक श्रीमंतांच्या यादीत अकरावे स्थान मिळाले आहे.

आता अदाणींच्या संपत्तीचे मूल्य ८४.४ अब्ज अमेरिकी डॉलर असून ते आपला प्रतिस्पर्धी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा केवळ एक क्रमांकवर आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती ८२.२ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी आहे. गेल्या काही दिवसांत अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरचे मूल्य ६८ अब्ज अमेरिकी डॉलरने कमी झाले आहे. त्यामुळे आता जागतिक श्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणी यांचा क्रम मेक्सिकोचे कारलोस स्लीम, गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रीन आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बालमर यांच्याही खाली घसरला आहे.