Tue, March 28, 2023

ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Published on : 4 February 2023, 10:50 am
पडघा, ता. ४ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील मनसेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. थेट जनतेमधून सरपंचासह भिवंडी, शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये मनसेकडून चार थेट सरपंचांसह ४० ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. त्यामधून पुन्हा मनसेचे पाच उपसरपंच निवडून आले आहेत. या सर्वांनी भिवंडी लोकसभा क्षेत्राचे जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांच्या मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.