आर्टिफिशियल फुलांचा स्वस्त पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्टिफिशियल फुलांचा स्वस्त पर्याय
आर्टिफिशियल फुलांचा स्वस्त पर्याय

आर्टिफिशियल फुलांचा स्वस्त पर्याय

sakal_logo
By

घणसोली ः बातमीदार
कोणत्याही कार्यक्रमाची सजावट, मानसन्मान किंवा कोणाप्रती भावना व्यक्त करावयाच्या असोत, फुलांशिवाय सगळे अधुरेच! त्यामुळे सण-सोहळ्यांना फुलांचे महत्त्व वाढल्याचे दिसून येते. मात्र, खऱ्याखुऱ्या फुलांची जागा आर्टिफिशिअल फुलांनी घेतली असून बाजारातदेखील खऱ्याखुऱ्या फुलांपेक्षा नकली फुलांच्या स्वस्त पर्यायाला अधिक मागणी आहे.
-------------------------------
आपले घर सुंदर दिसावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी विविध कल्पनांचा आधार घेतला जातो. त्यात महिलावर्गाकडून तर घर सजवण्यासाठी घरात कृत्रिम फुलांचा वापर केला जातो. लग्न सोहळे असोत की महिलांच्या विविध हेअर स्टाईल, सध्या नकली फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. यामध्ये गुलाब, झेंडू, जास्वंद, जरबेरा, शेवंती, सूर्यफूल, ऑर्केड अशा आर्टिफिशिअल फुलांचा वापर होतो. वेल्वेटमध्ये असलेल्या फुलांनी अनेकांना घर सजवायला आवडते. तसेच लग्नात नवरी, डोहाळे जेवणात, तसेच सणासुदीला केसात घालायच्या अंबाड्यात देखील आर्टिफिशिअल फुलांचा वापर केला जातो. या फुलांनी सौंदर्य आणखीनच उठून दिसते. या फुलांची किंमत १० रुपये प्रतिनगापासून सुरू होत असून फुलांच्या प्रकारांवर किंमत अवलंबून आहे.