अंघोळीसाठी गढूळ पाण्याचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंघोळीसाठी गढूळ पाण्याचा वापर
अंघोळीसाठी गढूळ पाण्याचा वापर

अंघोळीसाठी गढूळ पाण्याचा वापर

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील आश्रमशाळांत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो. दादडे येथील अरविंद आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही अंघोळीसाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. येथील विद्यार्थी आश्रमशाळेजवळच असलेल्या ओहोळावर अस्वच्छ पाण्यात अंघोळ करीत असल्याचे निदर्शनास आल्याने या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत मनेसेचे अध्यक्ष योगेश शंकर पाटील यांनी बुधवारी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला. पाटील यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले.
गतवर्षी दादडे येथील आश्रमशाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याकरिता लाखो रुपये खर्चदेखील झाला आहे; मात्र एवढा खर्च करूनदेखील विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. ही शाळा निवासी असून शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत; मात्र मुलांना ओहोळावर जाऊन अस्वच्छ पाण्यात अंघोळीसाठी जावे लागत असल्याने या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

---------
बाह्य तक्रारारीच्या अनुषंगाने आम्ही दादडे येथील आश्रम शाळेला नोटीस बजावली आहे. पाहणी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- सुभाष परदेशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी