नरपडमध्ये रंगला माहेरवाशीणींचा मेळावा

नरपडमध्ये रंगला माहेरवाशीणींचा मेळावा

पालघर, ता. ८ (बातमीदार) : लग्न होऊन सासरी गेल्यावर माहेर लांब होते, असे म्हणतात; परंतु माहेरची आठवण मात्र कायम राहते. त्यात डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या नयनरम्य नरपड या गावी माहेरवाशिणींचा मेळावा भरला होता. या वेळी माहेरवाशिणींच्या आनंदाला उधाण आले होते. या कार्यक्रमाला शंभरपेक्षा जास्त माहेरवाशिणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन वसुधा पाटील (बेन), प्रवीणा पुरव, दीप्ती राऊत, रंजना राऊत, अलका पाटील, हर्षला राऊत, नलिनी राऊत यांनी केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून विरार येथील गीता ग्रंथालयाच्या अध्यक्षा छाया अजीव पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी सर्वच माहेरवाशिणींनी आपले विचार मांडले. लहानपणापासून आजपर्यंत आपल्या जीवनातील घटनांच्या आठवणी सांगितल्या. कित्येक माहेरवाशिणी नवतरुणी होत्या; तर कित्येक माहेरवाशिणी ७५ च्या पलिकडल्या होत्या. गाणे समूहगीत, नाटिका, विनोद, उखाणे सांगून त्यांनी मनोरंजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com