आसनगाव येथे पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन सभा

आसनगाव येथे पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन सभा

Published on

पालघर, ता. ८ (बातमीदार) : आसनगाव येथील वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मार्गदर्शन सभा कृषी विभागाने आयोजित केली होती. या वेळी वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान संस्थेचे विद्यार्थी व आसनगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती पाटील, डॉ. सृष्टी मौर्या, डॉ. तन्वी पाटिल, प्रा. सोनालिका पाटिल, अक्षय पाटील, प्राध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन सभा घेण्यात आली. या वेळी कृषी विद्यालयाचे व फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी उमेश पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्यबाबत सांगितले की, आपल्या रोजच्या आहारात पाव वडा, पिझ्झा, बर्गर यांचा वापर न करता ज्वारी, बाजरी आणि नागली यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थाचा वापर करावा. कृषी सहायक थोरात यांनी आभार व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.