
लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
पेण, ता. ४ (वार्ताहर) : प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे पेण तालुक्यातील जावळी परिसरात एका १७ वर्षीय आदिवासी समाजातील मुलीने शुक्रवारी (ता. ३) गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील जावळी येथील अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा मारून आरोपी राहुल वाघे (वय २२) राहणार पडगा, तालुका कल्याण याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबध ठेवले होते. मुलीच्या कुटुंबीयांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी राहुलला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्या मुलीचा प्रियकर राहुल वाघे याच्याविरोधात पेण पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पेण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.