
रविवारी रेल्वेवर मेगाब्लॉक
रविवारी रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबई, ता. ४ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ५) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी स्थानकांवर रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) पॅनेलचे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) पॅनेलमध्ये रूपांतर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर गोरेगांव ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.
...
मध्य रेल्व-
कुठे- माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम- सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच ठाणे येथून अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. पुढे या सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
...
हार्बर रेल्वे-
कुठे - वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
परिणाम-
सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर/मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी असेल. पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील.
...
पश्चिम रेल्वे-
कुठे- बोरिवली/ गोरेगाव ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी - शनिवारी रात्री १०.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत
परिणाम -
अप आणि डाऊन मार्गांवरील जलद लोकल सेवा बोरिवली/ गोरेगाव ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येणार आहेत.