जीवनदीप महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्‍साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनदीप महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्‍साहात
जीवनदीप महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्‍साहात

जीवनदीप महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्‍साहात

sakal_logo
By

खर्डी, ता. ६ (बातमीदार) : शिक्षण म्हणजे मुलीची शक्‍ती आहे; त्याकडे मुलींनी लक्ष दिले तरच यश प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खर्डीतील रक्षा बागुल यांनी केले. जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त सत्कार स्वीकारताना त्‍या बोलत होत्‍या. यावेळी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार माजी आमदार पांडुरंग बरोरा, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सुमित अधिकारी (युवा उद्योजक), प्रकाश खोडका (सामाजिक), विवेक नार्वेकर(राजकीय), उमेश धानके (प्रगतशील शेतकरी), अनंता चौधरी ( शैक्षणिक), वनिता खोकले (आरोग्य), महेश धानके (पत्रकारिता) व सहायक पोलिस निरीक्षक संदीप गीते (प्रशासकीय) यांच्यासह सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेली रक्षा बागुल, अजय कथोरे, कायनात सय्यद यांचा विशेष सत्कार करण्यात आला.