भिवंडीत महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ
भिवंडीत महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ

भिवंडीत महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ

sakal_logo
By

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व महाराष्ट्र मिलेट मिशनची सुरुवात तालुक्यातील पाच्छापूर येथे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी आकाशात मिलेट मिशनचे लोगो असलेले फुगे सोडून केली.
यानिमित्त तालुका कृषी अधिकारी, भिवंडी व रोटरी क्लब मुलुंड नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक आहार विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विविध शाररिक तपासण्या करण्यात आल्या. महिला, लहान मुले व शेतकऱ्यांना आहारविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. शेतकऱ्यांनी आहारात जास्तीत जास्त पौष्टिक तृणधान्याचा वापर करण्या बरोबरच लागवड क्षेत्रात सुद्धा वाढ करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले.