ईशा जाधवला सुवर्णपदक

ईशा जाधवला सुवर्णपदक

Published on

पालघर, ता. ८ (बातमीदार) : भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ खेळामध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पालघर जिल्ह्यातील ईशा जाधव हिने यजमान मध्य प्रदेशच्या स्पर्धकावर मात करून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत इशा जाधवसमोर यजमान मध्य प्रदेशची शिवकन्या मुक्ती व रोशनी यादव यांचे आव्हान होते. ईशाने आपली चुणूक दाखवून अंतिम रेषा पार करत सुवर्णपदक पटकावले. शिवकन्या हिला दुसऱ्या; तर रोशनी हिला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. या स्पर्धेत व्यवस्थापक म्हणून पालघरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने काम पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.