डॉ. बाबा पाटील यांचे ऑनलाईन व्‍याख्‍यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बाबा पाटील यांचे ऑनलाईन व्‍याख्‍यान
डॉ. बाबा पाटील यांचे ऑनलाईन व्‍याख्‍यान

डॉ. बाबा पाटील यांचे ऑनलाईन व्‍याख्‍यान

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः भारतीय विद्या भवन तर्फे बुधवारी (ता. ८) संस्‍थापक अध्‍यक्ष कुलपती डॉ. के. एम. मुन्‍शी यांच्‍या पुण्यमिथी निमित्त श्रद्धांजली समर्पण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी दुपारी ३.३० ते ४ या वेळेत भारतीय विद्या भवनच्‍या गीता मंदिर सभागृहात गीतेचा पंधरावा अध्‍याय व विष्‍णु सहस्‍त्रनाम स्‍तोत्राचे पारायण होणार आहे. तसेच ‘महाराष्‍ट्रातील संत साहित्‍य व लोकशिक्षणाची भूमिका या विषयावर भवन्‍स हजारीमल सोमाणी महाविद्यालयाच्‍या मराठी विभागाचे उप प्राचार्य प्रा. डॉ. बाबा पाटील यांचे ऑनलाईन व्‍याख्‍यान होणार आहे. या कार्यक्रमास उपसिथत राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.