बंद इमारतींमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद इमारतींमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे
बंद इमारतींमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

बंद इमारतींमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

sakal_logo
By

वाशी, ता. ६ (बातमीदार)ः दिघ्यातील एमआयडीसी, तसेच सिडकोच्या भूखंडावरील ९९ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या भूखंडावरील चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत; तर उर्वरित नऊ इमारतींमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही कारवाई करण्यात आलेल्या इमारतींमध्ये गुर्दल्ल्यांचा वावर वाढल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दिघा येथे एमआयडीसी, तसेच सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा इमारती न्यायालयाकडून जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत पाच इमारती एमआयडीसीकडून जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत; तर उर्वरित इमारतीच्या ठिकाणी एमआयडीसीकडून पत्रे लावण्यात आले आहेत. मात्र, एमआयडीसीने केलेली कारवाई झुगारून काही मटण विक्रेते गॅरेजवाल्यांनी कारवाई केलेल्या इमारतींमध्ये अतिक्रमण केले आहे; तर ईश्वरनगर येथील सिडकोच्या भूखंडावरील इमारतींमध्ये मद्यपी तसेच उनाड मुले प्रवेश करत असल्याने रात्रीच्या वेळेला अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------
कारवाईची प्रक्रिया संथगतीने
एमआयडीसीच्या भूखंडांवरील सील करण्यात आलेल्या इमारतींमधील तीन इमारती जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे; तर उर्वरित इमारती जमीनदोस्त केल्यानंतर भूखंडाची विक्री करण्यात येणार आहे, पण ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
------------------------------------
न्यायालयाच्या आदेशांनुसार या इमारती सील करून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच यामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती आहे.
- पांडुरंग जाधव, नागरिक