चरी पावन-दह्याले रस्त्याची दुर्दशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चरी पावन-दह्याले रस्त्याची दुर्दशा
चरी पावन-दह्याले रस्त्याची दुर्दशा

चरी पावन-दह्याले रस्त्याची दुर्दशा

sakal_logo
By

कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा-सायवन रस्त्यावर चरी पावन-दह्याले रस्ता खराब झाला असून रस्त्यावरील मोरी धोकादायक बनली आहे. त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कासापासून १२ ते १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चरी पावन दह्याळे गावात जाण्यासाठी सायवन-कासा या मुख्य रस्त्यावरुन जावे लागते. पण गावात जाणारा तीन ते चार किलोमीटर रस्ता नादुरस्त असून रस्तावर खडी निघाली असून पुढें असणारी मोरी एका ठिकाणी अपूर्ण असून तेथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. मागीलवर्षी मोठ्या पावसाच्या पुरामुळे मोरी पुलाचा बराचसा भाग वाहून गेला होता. या भागात शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी यांना या नादुरस्त रस्ता व धोकादायक पुलामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर हा रस्ता व पुल दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

------------
चरी पावन ते दह्याळे हा रस्ता खराब झाला असून पुढे असणारा पूलदेखील धोकादायक झाला आहे, तो दुरुस्त झाला पाहिजे. या रस्ता दुरूस्तीसाठी पंतप्रधान सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप घेतले असून त्या कामासाठी आम्ही पाठ पुरावा करीत आहोत. त्याच बरोबर दह्याले-कांदरवडी हा रस्तादेखील खराब झाला असून त्याचीसुद्धा दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- सुनील भोईर, सरपंच, चरी पावन