राहुल गांधींवरील दाव्याची ४ मार्चला सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधींवरील दाव्याची ४ मार्चला सुनावणी
राहुल गांधींवरील दाव्याची ४ मार्चला सुनावणी

राहुल गांधींवरील दाव्याची ४ मार्चला सुनावणी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर शनिवारी (ता. ४) भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील ४ मार्च रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सांगितले.

शनिवारी सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे यांच्यातर्फे अॅड. नंदू फडके यांनी बाजू मांडली, तर खासदार राहुल गांधी यांची बाजू अॅड. नारायण अय्यर यांनी मांडली. खासदार राहुल गांधी हे दिल्लीत राहत असून लोकसभा सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत वकील त्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि खटला पुढे चालवतील, या आधारावर कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून शनिवारी न्यायालयात नारायण अय्यर यांनी युक्तिवाद केला. मात्र याचिकाकर्ता कुंटे यांच्या वकिलांनी गांधी यांना कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्यावर आक्षेप घेतला. गांधी यांना सुनावणीसाठी हजेरीला कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर ४ मार्च २०२३ रोजी युक्तिवाद केला जाईल, असे अय्यर यांनी सांगितले.