जव्हारमध्ये संत रोहिदास जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये संत रोहिदास जयंती साजरी
जव्हारमध्ये संत रोहिदास जयंती साजरी

जव्हारमध्ये संत रोहिदास जयंती साजरी

sakal_logo
By

जव्हार, ता. ६ (बातमीदार) : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत थोर विचारवंत संत आणि समाज कार्यकर्ते होऊन गेले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या भूमीत अनेक संतांनी आपले योगदान देऊन सामाजिक विकास घडवला आहे. जव्हार शहरातील मुकणे कॉलनीत रविवारी (ता. ५) संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य चर्मकार आयोग समितीचे सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी समाजाच्या कल्याणाकरिता योगदान दिले आहे. त्यांना आदर्श मानून समाज घडवण्याचा प्रयत्न मी करीत आहे, असे मत या वेळी विनीत मुकणे यांनी केले. या वेळी राजाराम मुकणे ,नितीन बल्लाळ, प्रा. धांडे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आणि अनुयायी उपस्थित होते.