रिक्तपदांविरोधात रेल्वे मोटरमनचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्तपदांविरोधात रेल्वे मोटरमनचे आंदोलन
रिक्तपदांविरोधात रेल्वे मोटरमनचे आंदोलन

रिक्तपदांविरोधात रेल्वे मोटरमनचे आंदोलन

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेमार्गावर लोकल रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनची १५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या मोटरमनवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहेत. त्यातच सिग्नलविषयक नियम मोडल्यास रेल्वेकडून कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे मोटरमनना तणावाखाली काम करावे लागत आहे. मध्य रेल्वच्या कारभाराविरोधात सुमारे १७०० मोटरमननी सोमवारपासून (ता. ६) काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले. उद्या (ता. ७) देखील हे आंदोलन सुरू राहणार असून प्रशासनाने कारवाई थांबवली नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मोटरमन संघटनेने दिला आहे.